मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसमध्ये एका कुंटुबाला 'जय श्री राम' बोलण्यास भाग पाडल्याप्रकरणी विद्यार्थ्यांसह चेंबूर येथील एका रहिवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुटुंब कणकवलीहून ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर कणकवली ते पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी हा प्रकार घडला.
पीडित कुटुंबाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसमध्ये आरोपींनी शुक्रवारी दुपारपासून 'जय श्रीराम'च्या घोषणा देत गोंधळ घातला. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. मग त्यांनी 'मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा' गाण्यास सुरुवात केली. आम्ही सहभागी होत नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यांच्यातील एकजण आमच्याजवळ आला आणि त्यांनी जय श्री राम बोलण्यास सांगितले. परंतु, आम्ही त्यांना आम्हाला एकटं सोडा, असे आवाहन केले. मात्र, त्यानंतर त्यांनी आम्हाला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या मुलाच्या अंगावर चहाचा कपही फेकला. हा प्रकार मी रेल्वे टीसीला सांगितला. टीसी आसपास असताना त्यांनी त्यांचा छळ थांबवला. पण तो गेल्यानंतर ते पुन्हा सुरू झाले. त्यानंतर मी रेल्वे हेल्पलाईनवर फोन केला, तिथे एका प्रतिनिधीने पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर मदतीचे आश्वासन दिले. तिथे पोहोचल्यावर आम्हाला राजकीय पक्षांचा जमाव आणि पोलीस आधीच उपस्थित दिसले, पण पोलिसांनी आमची तक्रार नोंदवण्यात रस दाखवला नाही, असे पीडित कुटुंबाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांना हे प्रकरण मागे घेण्यास सांगितले. परंतु, पीडित कुटुंब त्यांच्या निर्णयावर ठाम होते. प्रवासादरम्यान, त्यांना बराच काळ छळ सहन करावा लागला. पीडित कुटुंबाला आरोपींची नावे माहिती असताना पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींनी त्यांच्या गटामधील मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवर गुन्हा दाखल करावा, अशी त्यांनी मागणी केली. पीडित कुटुंब त्यांच्यावर झालेला अन्याय सहन करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे प्रकरण आता कणकवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. मनसेचे रायगड जिल्हाप्रमुख योगेश चिले यांनी या विद्यार्थ्यांना ओळखत असल्याचे सांगितले. सदर कुटुंबाने पोलिसांत दाखल केलेली तक्रार खोटी असल्याची त्यांनी दावा केला आहे. या गटात चा मुले आणि एक मुलगी असे एकून पाच जण होते. कणकवलीतील एका कॉलेजमधून ते काही प्रदर्शनासाठी ठाण्यात जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अंताक्षरी खेळत होते आणि भ' अक्षरावर त्यांनी 'भारत बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा' गायले. यामुळे सदर कुटुंब संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, अशी माहिती योगेश चिले यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम १४३ (बेकायदेशीर जमाव), ५०४ (सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी किंवा दुसरा गुन्हा करण्यास प्रवृत्त करू शकते हे जाणून जाणीवपूर्वक दुसर्या व्यक्तीचा अपमान करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या