Grant road building collapse:मुंबईत सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाच्या तडाख्यामुले मुंबईत पहिली दुर्घटना घडली आहे. मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला असून, यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या चार माजली इमारतीची बाल्कनी कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, कर्मचाऱ्यांकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
म्हाडाने यापूर्वी रुबूनिसा मंजिलला नोटीस बजावली होती. अहवालानुसार,बाल्कनीचे काही भाग आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब अंशतः कोसळला,तर काही भाग अद्याप लटकत आहे. या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. दुर्घटना घडलेली इमारत फार जुनी असून, या इमारतीचा काही भाग सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
या इमारतीबाबत सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून रहिवाशांना इशारा देण्यात आला होता. सदरची इमारत धोकादायक असल्याचे प्रशासनाने आधीच घोषित केले होते. मात्र, प्रशासनाने वारंवार सांगूनही रहिवाशांनी ही धोकादायक इमारत रिकामी केली नव्हती. आता झालेल्या या गंभीर दुर्घटनेत जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे या धोकादायक इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बचावकार्यात पावसामुळे काहीसा अडथळा येत असून, ढिगाऱ्याखाली आणखी अडकलेय का याचा शोध सुरू आहे.
रुबूनिसा मंजिलमधील ही दुर्घटना घडली, तेव्हा या इमारतीच्या बाल्कनीमध्ये सात ते आठ लोक उभे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, अग्निशमन दलाने या दुर्घटनेला लेव्हल वन इमर्जन्सी म्हणून घोषित केले आहे. सध्या मुंबईत पावसाचा जोर वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
संबंधित बातम्या