मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आबांच्या लेकाचा पुन्हा डंका.. खा. संजय पाटलांना धक्का, ‘किदरवाडी’वर एकहाती सत्ता

आबांच्या लेकाचा पुन्हा डंका.. खा. संजय पाटलांना धक्का, ‘किदरवाडी’वर एकहाती सत्ता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 05, 2022 07:38 PM IST

रोहित पाटील यांनीकवठेमहांकाळ नगरपरिषदेतील विजयानंतर विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाडदिला आहे. आज जाहीर झालेलेल्या ग्रामपंचायत निकालात किदरवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्तामिळवून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना धक्का दिला आहे.

रोहित आर पाटील
रोहित आर पाटील

सांगली - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषदेतील विजयानंतर विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. आज जाहीर झालेलेल्या ग्रामपंचायत निकालात किदरवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना धक्का दिला आहे. मिळवली आहे. रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीतही विरोधकांसह राष्ट्रवादी अंतर्गत गटावर मात करून विजयश्री खेचून आणली होती. 

भाजप उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त -

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या पॅनलचे सर्व सात उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉजिटही जप्त झाले आहे.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर सांगली राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. अशात त्यांचे पुत्र रोहित पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीतही आपली छाप पाडली होती. यानंतर आता किदरवाडी ग्रामपंचायतही राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. आज सकाळी तासगाव तहसीलदार कार्यालयावर ही मतमोजणी पार पडली. निवडणुकीत एकूण मतदार संख्या ६७७ असून ३७८ जणांनी मतदान केले होते. ३ प्रभागांमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर निवडणुकीसाठी ५५ टक्के मतदान झाले होते.

याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील यांच्या पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. त्यामुळे याठिकाणी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात रोहित पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या पॅनलने बाजी मारली.

IPL_Entry_Point