BRS party in Maharshtra : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat Election Result) निकाल आज समोर येत आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात चंचुप्रवेश केला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षानेही यश मिळवत आपली उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत मराराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला १० ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला आहे.
बीआरएसने भंडाऱ्यातील ९ ग्रामपंचायतींवर तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतीवरही झेंडा फडकावला आहे.
भंडारा जिल्ह्यात बीआरएसने बाजी मारली आहे. भंडारा जिल्ह्यातील ६६ पैकी २० ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. महाराष्ट्रात मजबूत असणाऱ्या भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला मागे सारत बीआरएस पक्षानं आतापर्यंत भंडाऱ्यातील ९ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाने प्रत्येकी २-२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भंडाऱ्याबरोबरच बीआरएस पक्षाने बीडमध्येही विजयाचे खाते उघडले आहे. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झंडा फडकावला असून शशिकला भगवान मस्के या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
के चंद्रशेखर राव यांनी शक्तीप्रदर्शन करत आषाढी एकादशीला तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात ग्रँड एंट्री केली. त्यांनी तेलंगाणानंतर बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या