GB Syndrome मुळे महाराष्ट्रात महिनाभरात ८ मृत्यू; राज्य सरकारला आजाराचे गांर्भिय नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  GB Syndrome मुळे महाराष्ट्रात महिनाभरात ८ मृत्यू; राज्य सरकारला आजाराचे गांर्भिय नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप

GB Syndrome मुळे महाराष्ट्रात महिनाभरात ८ मृत्यू; राज्य सरकारला आजाराचे गांर्भिय नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Published Feb 12, 2025 09:01 PM IST

GB syndrome news: राज्यात GBS आजार पसरतोय.यामुळे आता मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. परंतु या आजाराला रोखण्यासाठी राज्य सरकार फारसे गंभीर दिसत नसल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

जीबीएस आजाराच्या वाढत्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाहीः नाना पटोले
जीबीएस आजाराच्या वाढत्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाहीः नाना पटोले

राज्यात GBS आजाराचा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आहे. या एका महिन्यात या आजाराने राज्यभरात आतापर्यंत ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे. परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात नसल्याचे दिसत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल, मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील’ असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही, असं नाना पटोले म्हणाले. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाय योजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते. पण जीबीएस सारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Haaris Rahim Shaikh

TwittereMail

हारीस शेख हे हिंदुस्तान टाइम्स -मराठीचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स (ऑनलाइन)चे संपादक म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी मटा (ऑनलाइन)चे दिल्ली प्रतिनिधी, ईटीव्ही -मुंबई ब्युरोमध्ये प्रतिनिधी म्हणून काम केले. टिव्ही, प्रिंट आणि डिजिटल न्यूज माध्यम क्षेत्रात २३ वर्ष काम करण्याचा अनुभव. राजकारण, अर्थजगत, आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर नियमित लिखाण.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर