Maharashtra Flood : पूरग्रस्तांना दिलासा.. सरकारकडून १० हजारांची तातडीची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा-government announced 10 thousand rupees immediately help to flood victims ajit pawar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Flood : पूरग्रस्तांना दिलासा.. सरकारकडून १० हजारांची तातडीची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Flood : पूरग्रस्तांना दिलासा.. सरकारकडून १० हजारांची तातडीची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

Jul 24, 2023 05:33 PM IST

Flood in Maharashtra : पूरग्रस्तांना तातडीने १० हजार रुपयांचीआर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Flood in Maharashtra : गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मूसळधार पावसाने शेतीचे तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार पुढं सरसावलं आहे. पूरग्रस्तांना तातडीने १० हजार रुपयांचीआर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

अजित पवारांनी जाहीर केलं की, अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवलं जाणार आहे. यासाठी स्वस्त धान्याच्या दुकानात पुरेसे धान्य पोहोचवण्याच्या सूचना प्रशासनालाआजच देण्यात आल्या आहेत.

रोगराई पसरू नये यासाठी योग्य ती फवारणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहे. पूरग्रस्तांना तातडीने १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

नद्यांना व नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते वाहून गेल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे,तिथे तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

अजित पवार म्हणाले की, पुराचं पाणी घरात शिरून ज्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, वह्या, पुस्तके खराब झाली आहेत, त्यांना साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या आहेत.