मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 22, 2022 09:25 AM IST

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (फोटो - पीटीआय)

राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना मुंबईत गिरगाव रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भगत सिंग कोश्यारींना कोरोनाची लागण जाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांच्या प्रकृतीबाबत काही सांगण्यात आलेले नाही. राज्यपालांना सकाळी सव्वा नऊ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोव्याच्या राज्यपालांकडे तात्पुरती महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिली आहे. पी. श्रीधरन यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आल्याची माहिती समजते.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गदारोळात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा वेळीच राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने आणि ते रुग्णालयात दाखल झाल्यानं आता अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. एका बाजुला एकनाथ शिंदे हे सोबतच्या आमदारांसोबत गट स्थापन करण्याची तयारी करत आहेत. ते राज्यपालांकडे याबाबत दावा करणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग