मुंबई : मुंबईत लोकल प्रवाशांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाही. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने तसेच विविध कामामांमुळे सातत्याने ब्लॉक जाहीर होत असल्याने त्रस्त असलेल्या प्रवाशांना आणखी मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असून या साठी तब्बल २० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २७ नोव्हेंबरपासून पुढील २० दिवस हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. साधारण चार ते पाच तास हा ब्लॉक राहणार असल्याने प्रवाशांचा त्रास वाढणार आहे. या ब्लॉकचे वेलपत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वेकडून गोखले पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी तांबल ९० मीटर लांबीचा गर्डर उभारण्यात येणार आहे. या गर्डरचे सुटे भाग एकत्र करून त्यांची जोडणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तब्बल १३०० टन एवढे वजन या गर्डरचे आहे. या साठी खास क्रेन मंगवण्यात आला असून त्यांच्या साह्याने हा गर्डर बसवण्यात आला आहे.
दरम्यान, या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असून नागरिकांना तसेच लोकल फेऱ्यावर कमी परिमाण व्हावा यासाठी हा रात्र कालीन ब्लॉक घेतला जाणार आहे.