Listen To This Page : फोनमध्ये न पाहता समजणार स्क्रीनवरील कंटेंट; गुगलनं आणलंय भन्नाट फीचर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Listen To This Page : फोनमध्ये न पाहता समजणार स्क्रीनवरील कंटेंट; गुगलनं आणलंय भन्नाट फीचर!

Listen To This Page : फोनमध्ये न पाहता समजणार स्क्रीनवरील कंटेंट; गुगलनं आणलंय भन्नाट फीचर!

Jun 17, 2024 07:23 PM IST

google new feature: गुगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी लिसन टू दिस पेज नावाचे जबरदस्त फीचर आणले आहे, यामुळे वापरकर्त्यांना फोनमध्ये न पाहता स्क्रीनवरील कंटेंट समजणार आहे.

गूगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी भन्नाट फीचर्स आणले आहे.
गूगलने आपल्या वापरकर्त्यांसाठी भन्नाट फीचर्स आणले आहे.

Google Chrome: गुगलने आपल्या युजर्सच्या इंटरनेट एक्सपीरियंसमध्ये एक उत्तम फीचर आणले आहे. लिसन टू दिस पेज असे या फीचरला नाव देण्यात आले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामुळे वेब पेजचा कंटेंट युजरच्या आवडीच्या भाषेत आणि आवाजात ऐकू येतो. हे फीचर आल्याने युजरला लाँग कंटेंट वाचण्यासाठी जास्त वेळ अँड्रॉइड फोनस्क्रीनकडे पाहावे लागणार नाही. युजर्सना हँडफ्री अनुभव देणारे हे फीचर रोलआऊट सुरू झाले. लवकरच हे फीचर क्रोमच्या सर्व युजर्सपर्यंत पोहोचेल.

गुगलने हेल्प पेजच्या माध्यमातून हे नवे फीचर सादर केले आहे. कंपनीने सांगितले की, आता युजर्स वेबसाइटवर वाचलेला मजकूर त्यांच्या अँड्रॉइडवर ऐकू शकतात. यासाठी प्ले, पॉज, रिविंड आणि फास्ट फॉरवर्ड असे पर्यायही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे युजर्स त्यांच्या गरजेनुसार कंटेंटचा प्लेबॅक स्पीड कमी किंवा वाढवू शकतात. याशिवाय गुगल युजर्सला आवडीचा व्हॉईस निवडण्याचा पर्यायही देत आहे. यामध्ये अधिक सानुकूलित अनुभवासाठी आपल्याला टेक्स्ट हायलाइटिंग ऑन किंवा ऑफ आणि ऑटो स्क्रॉल फीचर देखील चालू किंवा बंद करावे लागेल.

लवकरच हे फीचर डेस्कटॉपसाठी येणार

व्हॉइस प्रकार निवडण्यासाठी तुम्हाला रुबी, रिव्हर, फिल्ड आणि मॉसचा पर्याय मिळेल. भाषेबद्दल बोलायचे झाले तर यात इंग्रजी, हिंदी, बंगाली, अरबी, चायनीज, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश असे पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गुगल क्रोमचे हे फीचर त्याच वेबसाईटवर काम करेल जे त्याला सपोर्ट करेल. गुगलने डेस्कटॉपसाठी या फीचरची टेस्टिंग केली आहे. आशा आहे की, लवकरच ते डेस्कटॉपसाठी देखील रिलीज केले जाईल.

कसे सुरू करायचे?

हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर गुगल क्रोम ओपन करा. आता तुम्हाला ज्या वेबपेजवर ऐकायचे आहे त्यावर जा. उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉट मेनूवर टॅप करा. येथे 'लिसन टू दिस पेज' हा पर्याय निवडा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पॉडकास्ट स्टाईलमध्ये वेबपेजवरील मजकूर ऐकायला सुरुवात होईल.

Whats_app_banner