Panvel Goods Train Catches Fire: पनवेल ते खालापूर दरम्यान चौक रोडजवळ मंगळवारी दुपारी कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीला अचानक आग लागली. या आगीमुळे पनवेल ते खालापूर दरम्यानची रेल्वे सेवाही प्रभावित झाली आहे. आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, या आगीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमध्ये मंगळवारी दुपारी कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीला आग लागली. ही मालगाडी मुंबईहून मिरजकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पथक आणि पनवेल अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीमुळे चौक रोडवरील ओव्हरहेड वायर जळून खाक झाली असून, त्या लाईनवरील वीजपुरवठा बंद झाला आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भारतीय रेलवे सुरक्षा वाढवण्यासाठी ही प्रणाली वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वंयचालित रेल्वे सुरक्षा प्रणाली 'कवच'बाबत महत्त्वाची माहिती दिली. संशोधन डिजाइन आणि मानक संगठनकडून खासगी कंपन्यांच्या सहकार्यातून कवच सिस्टम डेव्हलप केले जाईल. ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत ट्रेन आपोआप थांबेल.