मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gondia Train Accident : गोंदियात रेल्वे आणि मालगाडीची धडक, ५० प्रवाशी जखमी

Gondia Train Accident : गोंदियात रेल्वे आणि मालगाडीची धडक, ५० प्रवाशी जखमी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 17, 2022 08:20 AM IST

भगत की कोठी या ट्रेनची मालगाडीला धडक होऊन झालेल्या अपघातात ५० जण किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात झाला.

गोंदियात भगत की कोठी रेल्वेचा अपघात
गोंदियात भगत की कोठी रेल्वेचा अपघात (फोटो - एएनआय)

Gondia Train Accident : गोंदिया शहराजवळ ‘भगत की कोठी’ या ट्रेनला अपघात झाल्याचे समोर आले आहे, या गाडीचे तीन डबे रूळावरून घसरून हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, यामध्ये 50 हून अधिक रेल्वे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही रेल्वे रायपूरहून नागपूरकडे निघाली होती. मध्यरात्री अडीच वाजता हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भगत की कोठी ही प्रवासी ट्रेन रायपूरकडून नागपूरच्या दिशेने निघाली होती. तेव्हा सिग्नल न दिसल्यानं मालवाहू ट्रेन आणि भगत की कोठी ट्रेन समोरासमोर आल्या. यामुळे भगत की कोठी या ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले. यात ५० प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग