Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला आहे. एका कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पाच महिन्यांच्या बाळासह ३ वर्षांची मुलगी व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जखमी दुचाकीचालक हा गंभीर असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले आहे.
संदिप राजु पंधरे (वय २९) हा तरुण त्याच्या दुचाकीवरून पत्नी चितेश्वरी पंधरे, मुलगा संचित पंधरे व घराशेजारी राहणारी पार्थवी सिडाम (वय ३) हिच्यासह गावावरून नवेगावबांध येथे जात होता. रविवारी संध्याकाळी बाराभाटी - नवेगावबांध मार्गावर मागून भरधाव येणा-या एका कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चितेश्वरी संदिप पंधरे, ५ महिन्याच्या चिमुकला संचित पंधरे व घराशेजारील पार्थवी सिडाम हे तिघे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक संदिप राजू पंधरे हा गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नवेगावबांध पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने मृतकांना व जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिघांचा मृत्यू झाला होता. जखमी जखमी संदिप पंधरे याला प्राथमिक उपचार केल्यावर त्याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयातील वरोरा येथे कार आणि ऑटोच्या भीषण अपघात दोघे ठार झाले तर १५ जण जखमी झाले. हा अपघात वरोरा तालुक्यातील येन्सा येथे रविवारी घडला. रामपूर येथे काम संपवून ऊसतोड कामगार ऑटोने वरोरा येथे जात असतांना चंद्रपूरला जाणाऱ्या एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजूनकर (वय ४६) आणि सविता अरविंद बुरटकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहे. जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या