Pune Gold smuggling : काय सांगता! चक्क विमानाच्या सीट खाली दुबईहून पुण्याला आणले १ किलो सोने! मुद्देमालासह एकाला अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Gold smuggling : काय सांगता! चक्क विमानाच्या सीट खाली दुबईहून पुण्याला आणले १ किलो सोने! मुद्देमालासह एकाला अटक

Pune Gold smuggling : काय सांगता! चक्क विमानाच्या सीट खाली दुबईहून पुण्याला आणले १ किलो सोने! मुद्देमालासह एकाला अटक

Jun 07, 2024 07:24 AM IST

Pune Gold smuggling : पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीने चक्क विमानाच्या सीट खाली सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीने चक्क विमानाच्या सीट खाली सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीने चक्क विमानाच्या सीट खाली सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Gold smuggling : पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीने चक्क विमानाच्या सीट खाली सोन्याची पेस्ट लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला असून तब्बल १ किलो ही पेस्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला आणि त्याने तस्करी करून आणलेले ७८ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.

Maharashtra Weather Update: मॉन्सून लवकरच राज्य व्यापणार! पुढील काही दिवस कोसळधारा; हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुबई येथून पुण्यात तस्करी करून आणलेले १ किलो ८८ ग्रॅम वजनाचे ७८ लाख रुपये किमतीचे २४ कॅरेट सोने कस्टम विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. ही कारवाई पाच जून रोजी करण्यात आली. आरोपी प्रवाशाला देखील अटक करण्यात आली आहे.

Ajit Pawar : चंद्रकांतदादांचं शरद पवार यांच्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य लोकांना आवडलं नाही, अजित पवार स्पष्टच बोलले

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुबईहून पुण्यात एक प्रवासी येत होता. तो विमानात बसला असता, त्याच्या हालचाली या संशयास्पद आढळल्या. दरम्यान तो बसलेल्या ठिकाणाची विमानातील अधिकाऱ्याने तपासणी केली. यावेळी सोन्याची पेस्ट एका सीटमधील एका पाईपमध्ये लपवून आणल्याचे आढळले. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पाइप जप्त करून त्याची तपासणी केली असता, त्यातून १ किलो ८८ ग्रॅम वजनाचे ७८ लाख रुपये किमतीच्या सोन्याची पेस्ट निघाली. ही पेस्ट पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.

दुबईहून सोन्याच्या तस्करीचे प्रकार वाढले

पुण्यात बुधवारी दुबईतून आलेल्या एसजी ५२ या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला खबऱ्या कडून मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी आणि तपासणी सुरू केली. त्यात एक व्यक्ति हा संशयास्पद वागत असल्याने तो बसलेल्या ठिकाणी तपासणी करत त्याची चौकशी केली. त्याच्या सामानात काही आढळले नाही. मात्र, सीट खाली तपासणी केली असता हे सोने आढळले.

गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळ हे तस्करीचे केंद्र झाले आहे. मोठ्या प्रमाणात दुबईहून या ठिकाणी सोन्याची तस्कर होत असल्याचे आढळले आहे. अनेक कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने जे जप्त करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर