सोनं, चांदी, १ लाख रुपये.. सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानींनी ५० जोडप्यांना काय-काय भेटवस्तू दिल्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सोनं, चांदी, १ लाख रुपये.. सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानींनी ५० जोडप्यांना काय-काय भेटवस्तू दिल्या

सोनं, चांदी, १ लाख रुपये.. सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानींनी ५० जोडप्यांना काय-काय भेटवस्तू दिल्या

Jul 03, 2024 12:17 AM IST

Mass Wedding : अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, सोन्याचे दागिने सोन्याच्या अंगठ्या, नाकातील रिंगा, चांदीचे दागिने जसे की पायातील पैंजन आदि सोन्या चांदीचे दागिने भेट दिले.

सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटूंबीय
सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटूंबीय (Special arrangement)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना अंबानी कुटुंबाने समाजातील वंचित घटकांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क (आरसीपी) येथे पार पडलेल्या या सामूहिक विवाहसोहळ्यात पालघर परिसरातील ५० जोडपी विवाहबंधनात अडकली. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र,  सोन्याचे दागिने सोन्याच्या अंगठ्या, नाकातील रिंगा, चांदीचे दागिने जसे की पायातील पैंजन आदि सोन्या चांदीचे दागिने भेट दिले.

अंबानी दांपत्याने प्रत्येक जोडप्याला एक वर्षासाठी पुरेल इतके किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट म्हणून दिल्या. यामध्ये ३६ जीवनावश्यक वस्तू, भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, पंखा अशी उपकरणे, गादी व उशी यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक वधूला स्त्रीधन म्हणून १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

या सामूहिक विवाहाला वधू-वरांचे कुटुंबीय, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातील सदस्यांसह ८०० हून अधिक लोक उपस्थित होते. समारंभानंतर पाहुण्यांसाठी भव्य भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

केले स्थानिक वारली जमातीने सादर केलेले पारंपारिक तारपा नृत्य पाहण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून अंबानी दांपत्यांकडून वंचितांच्या सामूहिक विवाहाचे आयोजन केले जाते.

नीता आणि मुकेश अंबानी या उदात्त कार्यास हातभार लावत आहेत आणि कुटुंबासमवेत या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.

लहानपणीचे मित्र आणि प्रेयसी बनलेले अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर १४ जुलै ला ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे.

 

अनंत आणि राधिकाचा साखरपुड्याचा जंगी सोहळा पार पडला आहे. भव्य दिव्य झालेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. या साखर पुड्याची मोठी चर्चा जगभरात होती. आता दोघांचाही शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र, त्या अधिक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लग्नापूर्वी त्यांनी वंचित जोडप्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. हा विवाह सोहळाही मोठ्या थाटा माटात पार पडला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर