निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त

Nov 02, 2024 11:27 AM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील असलेल्या टोलनाक्याव पोलिसांनी तब्बल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने जप्त केले आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरात सापडलं घबाड! ५३ किलो चांदी, सोन्याची बिस्किटं, हिरे-मोत्यांचे २३ कोटींचे दागिने जप्त

ahilyangar news : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाद्वारे काला पैसा, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातूंवर कारवाई केली जात आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी तब्बल १३८ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतांना आता अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर आली असता या ठिकाणी तैनात असलेल्या पथकाने ही गाडी अडवली. या गाडीची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पथकाला आढळले. या दागिण्याबाबत तैनात असलेल्या पथकाने गाडीतील नागरिकांची कशी केली. मात्र, गाडीतील कर्मचाऱ्यांनी योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे हे दागिने जप्त करण्यात आले आहे.

हिरे-मोत्यांचे दागिने व ५३ किलो चांदी जप्त

पोलिसांनी सुपा टोलनाक्यावर केलेल्या कारवाईत तब्बल ५३ किलोच्या चांदीच्या ४० विटा, हिरे-मोत्यांचे काही दागिने व सोन्याची बिस्किटे जप्त केली आहे. या सोबतच काही अधिकृत पावत्याही देखील जप्त केल्या आहेत. वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. दरम्यान, या सर्व दागिन्यांचा पंचनामा हा गोल्ड व्हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या बिलांची आयकर विभाग तपासणी करणार आहे. दरम्यान, या गाडी सोबत असलेल्या बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गोरख भिंगारदिवे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

कुलाब्यातून १० कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात

दरम्यान, गुरुवारी मुंबईच्या कुलाब्यातून १० कोटी किमतीचे डॉलर्स पोलिसांनी जप्त केले होते. मरीन ड्राईव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम बँकेची असल्याची शक्यता तपास पथकाने वर्तवली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर