Mumbai News : राज्यात सध्या निवडणुकीच वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकील गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. मुंबईत वडाळा येथे एका इलेक्ट्रिशियनकडून तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अब्दुलकर मजीद असे इलेक्ट्रिशियचे नाव असून गुरुवारी (दि ७) त्याच्याकडून सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले. याची किंमत १ कोटी ११ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेल्या अब्दुलकार हा मूळचा चेन्नईचा असून त्याने डोंगरी येथे राहणाऱ्या शकील नामक व्यक्तिकडून हे सोन्याचे बॉल घेतले होते. हे बॉल मजीद अंधेरीतील एकाल देणार होता. तो रस्त्यावर फिरत असतांना पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता, त्याचाकडे सोन्याचे बॉल सापडले. या बाबत त्याला विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिली.
अब्दुलकर हा, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास फिरत असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे प्लॅस्टिकच्या टेपमध्ये गुंडाळलेले एकूण १४५७.२४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बॉल सापडले असून याची बाजार भावाप्रमाणे किंमत सुमारे १ कोटी ११ लाख रुपये असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या सोन्याबाबत त्याच्याकडे काही कागदपत्रे आहे का असे विचारले असता त्याला काहीही पुरावे देता आले नाही. त्याने पोलिसांना चुकीही उत्तरे दिल्याने त्याच्या जवळील सोने जप्त करून त्याला टक करण्यात आली.
दरम्यान तपासात हे सोन्याचे बॉल त्याने शकील नावाच्या व्यक्तीचे असल्याचे सांगितले. तो चेन्नई येथून हे सोने घेण्यासाठी आला होता. तो डोंगरीतील दर्गा येथे एका हॉटेलमध्ये थांबला होता. अब्दुल याच्या चुलत भावाने हे बॉल घेऊन अंधेरीतील एका व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी अब्दुलकर याला दिली. मात्र, त्याला आधीच अटक करण्यात आली.