मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gokul Milk : गोकुळच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱ्यांदा वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Gokul Milk : गोकुळच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱ्यांदा वाढ, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 08, 2022 10:28 PM IST

गोकुळने गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळनेएकरुपयाची वाढ केली असून ही दरवाढ ११ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

गोकुळच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱ्यांदा वाढ
गोकुळच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱ्यांदा वाढ

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध दुध उत्पादन संघ गोकुळने (Gokul Milk Price) दूध खरेदी दरात  पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने एक रुपयाची वाढ केली असून ही दरवाढ ११ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. 

गुरुवारी पार पडलेल्या गोकुळ संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या भाववाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं.

यापूर्वी दूर दरवाढ करताना गोकुळने सांगितले होते की, जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. ही दरवाढ ऑगस्टमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर अमूल आणि मदर डेअरीनेही दूध विक्री दरांमध्ये वाढ केली होती.

११ सप्टेंबरपासून गायीच्या ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ प्रतीच्या दुधाला ३२ रुपये प्रती लीटर एवढा भाव देण्यात येईल, असं गोकुळकडून सांगण्यात आलं आहे.

मागच्या सहा महिन्यांमध्ये गोकूळने दूध दरामध्ये तब्बल ५ रुपयांची वाढ केली आहे. याआधी १ ऑगस्ट २०२२ रोजी गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात २ रुपयांनी तर गायीच्या दूध विक्री दरात १ रुपयाची वाढ केली होती, त्यामुळे मुंबईत म्हशीच्या दुधासाठी ६६ रुपये मोजावे लागत होते.

IPL_Entry_Point

विभाग