मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Rain Update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, दारणा धरण ओव्हरफ्लो, गोदावरीला पूर

Nashik Rain Update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, दारणा धरण ओव्हरफ्लो, गोदावरीला पूर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 20, 2023 10:30 AM IST

Nashik Rain : मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Nashik Rain and Weather Update
Nashik Rain and Weather Update (HT)

Nashik Rain and Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीसह अन्य ठिकाणी झालेल्या पावसामुळं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. परिणामी दारणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यानंतर आता गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकसह इगतपुरीत मंगळवारी काही तासांतच तब्बल ४० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं दारणा धरणातील पाण्याची आवक अचानक वाढली आहे. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून गोदावरी नदीत ५१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. परिणामी गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळ पर्यंत पाण्याचा विसर्ग आठ हजारांपर्यंत केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पावसाचा जोर कमी होताच धरणाचे काही दरवाजे बंद केले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सटाणा, येवला, निफाड, दिंडोरी, चांदवड, पेठ आणि नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना ऐनवेळी मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये पावसाने पुनरागमन केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point