Vande Bharat : हे ऐकलं का? वंदे भारत ट्रेन रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat : हे ऐकलं का? वंदे भारत ट्रेन रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली…

Vande Bharat : हे ऐकलं का? वंदे भारत ट्रेन रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली…

Dec 24, 2024 12:52 PM IST

Vande Bharat lost its way : वंदे भारत एक्सपेस तिचा मार्ग चुकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही रेल्वे दिवा स्थानकातून पनवेलच्या दिशेने वळणार होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी थेट कल्याणच्या दिशेने गेली. रेल्वे अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी तात्काळ ही गाडी कल्याण स्थानकात थांबवली.

काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेस मार्ग चुकली; जायचे होते गोव्याला मात्र, पोहोचली....
काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेस मार्ग चुकली; जायचे होते गोव्याला मात्र, पोहोचली....

Vande Bharat News : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्यांपैकी एक असलेली वंदे भारत एक्सप्रेस तिच्या आलीशान सेवेसाठी व आरामदाई प्रवासाठी ओळखली जाते. देशात १०० पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र, ही गाडी  मार्ग चुकल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  ही ट्रेन  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून गोव्यातील मडगाव स्थानकावर जाणार होती. मात्र, ही गाडी मध्येच तिचा मार्ग चुकली व दुसऱ्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने धावू लागली.  

मार्ग चुकल्याने पोहोचली कल्याणला

वंदे भारत एक्सप्रेस ही  दिवा स्थानकातून पनवेलच्या दिशेने वळणार होती.  मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी थेट कल्याणच्या दिशेने वळली  गेली. ही बाब काही वेळ रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. नाही काही अंतरावर गेल्यावर ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी कल्याण स्थानकात थांबवली. काही वेळाने ही गाडी दिवा स्थानकात योग्य दिशेने आणली व नंतर आपल्या मूळ मार्गाकडे ही गाडी वळवण्यात आली. या झालेल्या चुकीमुळे ही ट्रेन ९० मिनिटे उशिराने मंडगाव येथे पोहोचली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.   

सिग्नल यंत्रणेत झाला बिघाड 

सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवा स्थानकातील १०३ क्रमांकाच्या पॉईंटवर सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, दिवा जंक्शनच्या डाऊन फास्ट लाइन आणि पनवेल मार्गादरम्यान ही घटना घडली.

तब्बल ३५ मिनिटे एकाच ठिकाणी थांबून होती रेल्वे 

दिवा स्थानकात सुमारे ३५ मिनिटे गाडी रखडल्याने मुंबईतील रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. ही गाडी मुंबईहून पहाटे ५.२५ वाजता सुटणार होती आणि दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचणार होती. मात्र या बिघाडामुळे प्रवाशांना मडगाव येथे पोहोचण्यास उशीर झाला. या घटनेमुळे रेल्वेच्या हायटेक सिस्टीम आणि वंदे भारतसारख्या प्रीमियम रेल्वे सेवेवर देखील  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर