मुंबई – मुंबईत मंत्रालय परिसरात अचानाक दगड गोठ्यांचा तुफान वर्षाव सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. काय घडतंय ते कुणालाच समजत नव्हतं. मंत्रालय आणि आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या या विचित्र घटनेमुळे मंत्रालयाच्या इमरातीच्या तसेच आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. इतकेच नव्हते तर मंत्रालयासमोर पार्क केलेल्या अनेक वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत.
मेट्रो सबवे कामाच्या ब्लास्टमुळेहे नुकसान झाल्याचं समोर आले आहे. ब्लास्टमुळे दगड उडूनमंत्रालय परिसरात आले व खिडक्यांच्या काचा व वाहनांचे नुकसान झाले. मंत्रालयाच्या जवळच मेट्रोच्या सबवेचं काम सुरु आहे. या सबवेच्या कामासाठी अंतर्गत ब्लास्टिंगकेलं जात आहे. त्यावेळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मेट्रो कामाच्या ब्लास्टमुळेअनेक दगड मंत्रालयाच्या दिशेनेजोरात उडून आल्याने मंत्रालयासमोर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. तसेच इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्याचे दिसत आहेत. दुपारच्या सुमारास बाहेर सहसा कुणी नसल्याने सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.
संबंधित बातम्या