मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lingayat Mahamorcha : लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्या; हजारो लोक मुंबईत धडकले!

Lingayat Mahamorcha : लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्या; हजारो लोक मुंबईत धडकले!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 29, 2023 11:12 AM IST

Lingayat Mahamorcha at Azad Maidan Mumbai : लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे हा मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाला सुरुवात झाली आहे.

Lingayat Mahamorcha
Lingayat Mahamorcha

मुंबई : लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा मिळावा तसेच समाजाच्या विविध मंगण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे महामोर्चा काढण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. जो पर्यन्त मागण्या मान्य होणार नाही तो पर्यन्त आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवण्यात आला आहे.

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर २२ महामोर्चे काढण्यात आले आहेत. गेल्या आठवडयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत या संदर्भात चर्चा केली होती. सर्व मागण्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, लेखी उत्तर न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यामुळे आज मुंबईत आझाद मैदान येथे हा महामोर्चा काढण्यात येत आहे. १० वाजता पासून आझाद मैदानात लिंगायत समाजाचे हजारो नागरिक जमा झाले आहेत.

लिंगायत समाजाला सांविधानिक मान्यता द्यावी, गावांमध्ये स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा द्यावी, मिरज रेल्वे स्थानकाला बसवेश्वराचे नाव देण्यात यावे, लिंगायत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात यावे, राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा अशा विविध मागण्या लिंगायत समाजाने केल्या आहेत. या मागण्या जो पर्यन्त लेखी स्वरूपात मान्य होत नाही, तो पर्यन्त आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेलती आहे. आझाद मैदान येथे आम्ही शांततेत उभे राहून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले.

WhatsApp channel

विभाग