राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोठी बातमी आहे. व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत होती. ती आता १०० टक्के करून परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
राज्यातील महिला सक्षमीकरण अभियान अतंर्गत, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेण्याची उमेद असणारी व निधी अभावी कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिंनींचं परीक्षा १०० टक्के माफ करण्यात आले आहे.
OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना याचा फायदा होणार असून मुलींच्या उच्च शिक्षणात १०० टक्के फी सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. उद्या (शनिवार) याबाबतचा जीआर निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर याची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्याया ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनीना याचा फायदा होणार आहे.
शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित महाविद्यालये, अशासकीय अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस, शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी, ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या विद्यारर्थिनींना या लाभ मिळणार आहे.
महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर ‘दृश्यता’ वाढविण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर’ निर्माण करावे, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केली. अशा प्रकारच्या प्रदर्शन केंद्रामुळे मुंबईला येणाऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अतिथींना विद्यापीठाची महती व संशोधन, गृह विज्ञान, क्रीडा व इतर क्षेत्रातील उपलब्धी समजण्यास मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विद्यापीठाच्या महर्षी कर्वे शैक्षणिक परिसर, मुंबई येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी सन १९१६ मध्ये याच दिवशी विद्यापीठाची स्थापना केली होती.