Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडचा तरुणीच्या घरातील खिडकीतून गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडचा तरुणीच्या घरातील खिडकीतून गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडचा तरुणीच्या घरातील खिडकीतून गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

Jan 18, 2025 10:58 AM IST

Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहे. प्रेयसी बोलत नसल्याचा रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या घरी जात तिच्या घराच्या खिडकीतून गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

गर्लफ्रेडनं बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं थेट घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार
गर्लफ्रेडनं बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं थेट घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

Beed Crime : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन सख्ख्या भावांची हत्या भवांची हत्या करण्यात आली होती. या घटना ताज्या असतांना आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने बोलणे बंद केल्याच्या रागातून एका प्रियकराने तरुणीच्या घरी जात घराच्या खिडकीतून गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी वा जीवित हानी झालेली नाही. ही घटना आंबेजोगाई येथे शुक्रवारी घडली.

गणेश पंडित चव्हाण (वय २४) असे पीडित आरोपीचे नाव आहे. गणेशचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, तो तिला त्रास देत असल्याने तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचा राग गणेशला होता. या रागातून त्याने तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. दरम्यान, शुक्रवारी गणेश हा तरुणीच्या गावी आंबेजोगाईमध्ये गेला होता. त्याचा कडे गावठी पिस्तूल (कट्टा) होता. तो तरुणीच्या घरी गेला व आरडा ओरडा करू लागला. त्याने तिच्या घरचा जोरजोरात वाजवला. मात्र, आतून दरवाजा कुणीच उघडला नाही. यामुळे त्याने घरच्या खिडकीतून गावठी कट्टातून थेट गोळीबार केला. सुदैवाने यावेळी कुटुंबातील इतर मंडळी दुसऱ्या खोलीमध्ये होती. त्यामुळे कुणी गंभीर जखमी झाले नाही. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

पिस्तुले, देशी कट्ट्याचा प्रश्न ऐरणीवर

बीडमध्ये अवैध शस्त्रांचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथील ३०० हून अधिक शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. असे असतांना देखील बेकायदेशीर शास्त्राचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर झाला आहे. अगदी सहजपणे देशी कट्टे तरुणांना मिळत असल्याने येथे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अवैध शस्त्र विक्रीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे तरुणी व तरुणीचे कुटुंबीय धक्क्यात आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर