मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मी फक्त टाईमपास केला म्हणत प्रियकराने दिला लग्नास नकार..तरुणीने उचललं भयंकर पाऊल

मी फक्त टाईमपास केला म्हणत प्रियकराने दिला लग्नास नकार..तरुणीने उचललं भयंकर पाऊल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 11, 2022 04:27 PM IST

प्रियकराने प्रेयसीला मी तुझ्यासोबत टाईमपास केला,हे सांगितल्यावर प्रेयसीने टोकाचं पाऊल उचलत आपले आयुष्य संपवलं आहे. याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

अमरावती -  म्हणतात ना प्रेम आंधळे असते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर प्रेमीयुगुल सात जन्म सोबत राहण्याच्या  शपथा घेतात. मात्र प्रेमात काही अडचणी आल्यावर किंवा समोरच्याकडून आपल्या प्रेमास नकार दिल्यावर प्रेमवीरांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही तुम्ही पाहिल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यातून एक प्रेम प्रकरणाशी (Love Affair) संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला मी तुझ्यासोबत टाईमपास केला, हे सांगितल्यावर प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

मी तुझ्यावर प्रेम वगैरे काही केलेले नाही. तर फक्त टाईमपास केला, असे एका प्रियकराने प्रेयसीला सांगितले आणि लग्नाला नकार दिला. यानंतर एका १९ वर्षाय प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २८ मे राजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी ८ जुलैला अमरावती येथील विशाल नावाच्या तरुणाविरोधात वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तरुणाविरोधात कलम ३०६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्याप आरापीला अटक करण्यात आलेली नाही.

२८ तारखेला एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यानंतर वलगाव पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती. यानंतर या प्रकरणाचा पोलीस तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. तपासात अनेक नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले. यात आरोपी विशाल आणि आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय तरुणीचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. तसेच दोघांमध्ये प्रेम इतके पुढे गेले की, या तरुणाने तिला लग्नाचे आमिषही दिले होते. यामुळे ही तरुणी त्याच्या प्रेमात वेडी झाली होती.

मात्र, काही महिन्यांपासून तो तिला टाळू लागला होता. तसेच त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, मी तुझ्यासोबत फक्त टाईमपास केला. मला आता दुसरी मुलगी मिळाली आहे. तुझे नातेवाईक माझ्या नातेवाईकांशी का बोलले, त्याचा मी वचपा घेतला आहे, असे म्हणत त्याने लग्नाला नकार दिला. हा सर्व प्रकार तिच्यासोबत घडल्यानंतर तिला धक्काच बसला. तिला हे प्रेमभंगाचे दु:ख तिला पचवता आले नाही, त्यामुळे अखेर तिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने २८ तारखेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

WhatsApp channel