अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर उतरली तरुणी, अचानक काढला टॉवेल अन् मग पुढं काय झालं पाहा VIDEO-girl walks in towel on mumbai streets suddenly flips and threw cloths people react video viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर उतरली तरुणी, अचानक काढला टॉवेल अन् मग पुढं काय झालं पाहा VIDEO

अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर उतरली तरुणी, अचानक काढला टॉवेल अन् मग पुढं काय झालं पाहा VIDEO

Aug 03, 2024 05:07 PM IST

Mumbai Viral Video : व्हायरल व्हिडिओमध्ये तनुमिता खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. तनुमिता अंगावर टॉवेल गुंडाळून रस्त्यावरून चालताना दिसत आहे.

अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर उतरली तरुणी
अंगावर केवळ टॉवेल गुंडाळून मुंबईच्या रस्त्यांवर उतरली तरुणी

सोशल मीडियाच्या या जमान्यात प्रसिद्धीसाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. त्यांना याची बिल्कूल पर्वा नसते की, त्यांच्या कृतीचा समाजावर काय परिणाम होणार आहे. त्यांना फॉलो करणाऱ्या तरुणांवर त्यांचा काय परिणाम होईल? मुंबईच्या रस्त्यावर असेच दृष्य पाहायला मिळाले. एक सोशल मीडिया सेलिब्रिटी अंगावर टॉवेल गुंडाळून रस्त्यावर फिरताना व्हिडिओ शूट करत आहे. अचानक तिने लोकांच्या गर्दीतच आपल्या अंगावरील टॉवेल काढून फेकला. काही क्षणासाठी तेथे उपस्थित लोकांमध्ये खळबळ माजली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला Myntra Fashion Superstar ची विजेती आणि Instagram वर हजारो फ़ॉलोअर्स असणारी प्रसिद्ध व्यक्ती तनुमिता घोष आहे. तिने मुंबईतील रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले. व्हायरल व्हिडिओमध्ये तनुमिता खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे. तनुमिता अंगावर टॉवेल गुंडाळून रस्त्यावरून चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहून वाटते की, ती बाथरूममधून नुकतीच अंघोळ करून रस्त्यावर आली आहे.

फुटेजमध्ये तनुमिता टॉवेल गुंडाळून रस्त्यावरून चालताना तर कधी बसताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'तौबा-तौबा' गाणे ऐकू येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मुंबईचे लोक हे रुप पाहून'तौबा-तौबा' म्हणू शकतात. व्हिडिओमध्ये ती कधी बाकड्यावर बसलेली तर कधी गर्दीतून चालताना दिसते.

व्हिडिओमध्ये पुढे पाहून धक्का बसतो जेव्हा अचानक ही तरुणी अंगावरील टॉवेल काढून फेकले. मात्र तिने टॉवेलच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर तनुषा एक पोज देते व व्हिडिओ संपतो. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासातच तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ आतापर्यंत १० लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर अनेक कमेंट करण्यात आले आहेत.

एक महिला यूजर सिमरनने या स्टंटवर टीका करत म्हटले की, लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक आजकाल काहीही करायला तयार होतात. एका यूजरने तनुमिताची तुलना अशा कृत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या सेलिब्रिटींशी केली. दरम्यान तनुमिताने स्पष्टकेले की, हा व्हिडिओ २०१९ मधील एका शो मधील आहे. त्यामध्ये तिला एक टास्क दिला होता. तिने म्हटले की, हे गांभीर्याने घेऊ नये. याचा उद्देश्य केवळ मनोरंजन होता.

विभाग