Sambhajingar Crime : सोशल मिडियाच्या जगात आजची तरुणाई वाहवत चालली आहे. याचे अनेक दुष्परिनाम आता पुढे येऊ लागले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवरील मैत्री एक तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला असून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवा दत्तात्रय सुकासे आणि विकास प्रकाश सुकासे असे आरोपींची नावे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवरवरुन आरोपीशी ओळख झाली. यातून त्यांची मैत्री झाली. या मैत्रीतून प्रेमसंबंध जुळले. आरोपीने या तरुणीला शहरातील एका लॉजवर नेत त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ तयार करत या व्हिडीओच्यामाध्यमातून तिच्या कुटुंबावर दबाव टाकून ब्लॅकमेल केले.
पीडिता ही छत्रपती संभाजी नगर येथील एका वसतिगृहात राहत होती. तिची २०२२ मध्ये शिवा सुकासे याच्यासोबत मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेत त्याने टीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका लॉजवर नेत अत्याचार केला. दरम्यान, यानंतर शिवाचा भाऊ विकासने तिला पळवून नेले.
या नंतर मुलीच्या कुटुंबाने तक्रार दिली असता, ती मागे घेण्यासाठी दोन्ही आरोपींनी तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी त्यांनी आधी पोलीसांत तक्रार दिली नाही. मात्र, आरोपींनी मुलीला त्रास देण्यास पुन्हा सुरुवात केल्याने पीडित मुलीने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या