नातेवाईकांना बाहेर थांबवून नराधम भोंदूबाबाचा मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नातेवाईकांना बाहेर थांबवून नराधम भोंदूबाबाचा मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना

नातेवाईकांना बाहेर थांबवून नराधम भोंदूबाबाचा मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना

Dec 31, 2024 10:05 AM IST

Kalyan Crime : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने लहान मुलीवर अत्याचार केले आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

नातेवाईकांना बाहेर थांबवत नराधम भोंदुबाबाचं मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना
नातेवाईकांना बाहेर थांबवत नराधम भोंदुबाबाचं मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan Crime : कल्याण येथे एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अघोरी विद्येच्या नावाखाली, घरच्या समस्या सोडवण्यासाठी भोंदूबाबजवळ गेलेल्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीवर भोंदू बाबाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलिस शोध घेत आहे. ही घटना कल्याणजवळील आंबिवली मोहने परिसरात घडली.

काय आहे प्रकार ?

घरातील वाद, अडीअडचणी सोडवण्यासाठी एक महिला ही तिच्या परिचित असलेल्या एका भोंदू बाबाकडे गेली होती. यावेळी तिच्या सोबत तिची मुलगी देखील होती. यावेळी अघोरी विद्येच्या नावाखाली या भोंदूबाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केले. यामुळे मुलगी घाबरून पळत बाहेर आली. तिने तिच्या सोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर आईने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही तिच्या आईसह कल्याण जवळील आंबिवली परिसरात राहते. तिला काही अडचणी असल्याने ती भोंदू बाबा अरविंद जाधव याच्याकडे काही नातेवाईकासह गेली होती. यावेळी भोंदू बाबाने नातेवाईकाला बाहेर थांबण्यास सांगून मुलीसोबत गैरकृत्य केलं.

या प्रकरणी कल्याण-खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ.अमरनाथ वाघचौरे म्हणाले, या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत दुसरी तक्रार आली नसून दाखल गुन्ह्यानुसार तपास सुरू आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या आईसह खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार भोंदू बाबा अरविंद जाधववर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, त्याने या पूर्वी आणखी काही महिला व मुलींसोबत असे काही कृत्य केलं आहे का ? या बाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या भोंदूबाबला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर