Viral news : असे म्हणतात की एकदा व्यक्ती जर प्रेमात वेडा झाला तर त्याला समोरच्या व्यक्तीच्या प्रेमसमोर सर्व गोष्टी तुच्छ वाटू लागतात. हे प्रेम एखाद्याला इतकं भ्रमित करू शकतं की प्रेम करणारी व्यक्ती समोरच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असते. अशीच एक घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे.
एका तरुणीचा जीव चक्क एका चोरावर जडला. याच चोराने तरुणीला तब्बल ११ लाख रुपयांनी गंडवले. मात्र, असे असतांना तिचे प्रेम तसूभर देखील कमी झाले नाही. फसवणूक झाल्यावर देखील तरुणीने प्रियकरासोबत अनेक ठिकाणी दरोडे टाकले. मात्र, आता ही तरुणी तुरुंगात खडी फोडत आहे. ही 'अजब प्यार की गजब कहानी' तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
ही घटना चीनच्या शांघाय शहरातील आहे. रिपोर्ट्सनुसार, एक ४० वर्षीय तरुणी ही एका चोराच्या प्रेमात पडली. हू असे या तरुणीचे नाव आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एका ऑनलाइन डेटिंग ॲपवर चेन नव्याच्या पुरुषाच्या प्रेमात हू पडली. चेन यांने हू ला तो व्यावसायिक आणि गुंतवणूकदार असल्याचे खोटे सांगितले. चेन ने हूची फसवणूक करून तिला तब्बल ११ लाख रुपयांनी गंडवले. जेव्हा हू ने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की तीची फसवणुक झाली आहे. मात्र, आकंठ प्रेमात बुडालेल्या हू ने पोलिसात तक्रार न देता प्रियकराची साथ देण्याचे ठरवले.
फसवणूक झाल्यानंतर जेव्हा हूने चेनशी संपर्क साधला तेव्हा त्याने पुन्हा एक नवी कथा सांगित तो एका घोटाळ्यात अडकला असल्याचा बनाव रचला. त्याने दावा केला की तो म्यानमारमध्ये एका घोटाळ्यात अडकला आहे व त्यामुळेच तो त्याचे पैसे काढू शकला नाही. इतकं होऊनही हू ला चेन तिची फसवूनक करत असल्याचे समजले नाही. कारण तिच्या डोळ्यात प्रेमाचा पडदा होता. आर्थिक नुकसान सोसूनही तिने तिचा प्रियकर चेनला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दरोडे घालण्यास सुरुवात केली. तिने अनेक लोकांची आर्थिक फसवून केली. चेन देखील केवळ हूच्या खात्यातून फसवे व्यवहार करत होता. या बदल्यात हू ला त्याने काही रक्कमही दिली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांनी हू ला अटक केली. हूने आपल्या कबुलीजबाबात संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिस देखील हैराण झाले. हू ही स्वतः साखळी गुंतवणुकीच्या फसवणुकीची बळी असल्याने तिला कोर्टाने फक्त अडीच वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला. या प्रकरणाची चर्चा मात्र, सोशल मिडियावर रंगली आहे.
संबंधित बातम्या