मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajinkyatara leopard news : खळबळजनक! अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला बिबट्याचा व तरुणीचा मृतदेह

Ajinkyatara leopard news : खळबळजनक! अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळला बिबट्याचा व तरुणीचा मृतदेह

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2024 10:20 AM IST

Satara Ajinkyatara fort news : सातारा येथे अजिंक्यतारा (Girl Dead body found on Ajinkyatara fort) किल्यावर झाडावर एका बिबट्याचा तर झाडाखाली तरुणीचा मृतदेह आढळण्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी ही एक महिन्यांपासून बेपत्ता होती.

अजिंक्यतारा किल्यावर झाडावर आढळला बिबट्याचा मृतदेह; तर खाली तरुणीचा मृतदेह
अजिंक्यतारा किल्यावर झाडावर आढळला बिबट्याचा मृतदेह; तर खाली तरुणीचा मृतदेह

dead body of girl and leopard found on ajinkyatara fort : सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजापासून काही अंतरावर एका झाडावर बिबट्याचा तर झाडाखाली मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलगी ही सातारा तालुक्यातील आहे. प्राथमिक तपासात या तरुणीने आत्महत्या केली असून, ती एक महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Reach person in the world : ना इलॉन मस्क ना जेफ बेझोस, आता या अब्जाधीश ठरला जगातील सर्वात श्रीमंत

प्रतीक्षा दीपक कदम (वय १७, रा. नागठाणे, ता. सातारा) असे मृत मुलीचे नाव आहे. तर मृत बिबट्याचे पिल्लू हे ७ ते ८ महिन्यांचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किल्ल्यावर एका झाडावर मृतावस्थेत बिबट्या आणि खाली मुलीचा मृतदेह अधल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर बिबट्यामुळे वन विभागाच्या पथकलाही पाचाराण करण्यात आले होते. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर बिबट्याचे पिल्लू असल्याचे आढळले असून हे पिल्लू ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे तपासात आढळले. बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना! १० जणांच्या टोळळ्याने भररस्त्यात तिघांना भोसकले; व्हिडिओ व्हायरल

तर मृत मुलगी ही नागठाणे परिसरातील असून ती १७ वर्षांची आहे. ती गेल्या २० वीस दिवसांपूर्वी बेपत्ता होती. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडून उग्र वास येत असल्याचे काही नागरिक किल्ल्यावर गेले. या ठिकाणी त्यांना एका झाडाखाली तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला. तर झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळला.

एकाच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अनिल शिरोळे, सुजित भोसले, इरफान पठाण, पंकज मोहिते आदी घटनास्थळी गेले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बिबट्याचा झाडाच्या दोन्ही फांद्यांमध्ये अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच दोघांच्याही मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. घटनास्थळी तरुणीचे कपडे, पैंजण, पाण्याची बाटली, बॅग सापडली आहे. ही बॅग व पाण्याची बाटली कुरतडली असून हा प्रकार बिबट्याने केला की दुसऱ्या कोणत्या प्राण्याने केला आहे याचा देखील तपास सुरू आहे.

IPL_Entry_Point