समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग

समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग

Jan 13, 2025 03:03 PM IST

Ratnagiri News : जहाजे किंवा होड्यांचे खराब झालेले इंजिन ऑइल समुद्रात फेकले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्राचे प्रदूषण होत होते. या साठी पुण्यातील 'गोखेल इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकानॉमिक्स'च्या 'सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट'कडून रत्नागिरीत एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे.

समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग
समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग

Sustainable solutions for fisherman's in Ratnagiri : समुद्रात मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींचे वापरले गेलेले ऑइल समुद्रात फेकून दिले जात होते. २०२३ मध्ये तब्बल ६ लाख लिटर वापरले गेलेले इंजिन ऑइलहे समुद्रात फेकून दिले गेले होते. यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास 'सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट', गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (सीएसडी-जीआयपीई) करण्यात आला असून हे प्रदूषण रोखण्यासाठी एक विशेष प्रकल्प सुरू या संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. यातून मच्छीमारांना समुद्रात फेकले जाणारे वापरलेले तेल विकून पैसे कमवता येणार आहे. परिणामी समुद्राचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत मिळणार आहे.

काय आहे मॉडेल ?

मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑइल खरेदी करुन त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषण रोखण्यासाठी 'ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क' (ओशन) हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या साठी पुण्यातील 'सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट', गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (सीएसडी-जीआयपीई) या संस्थेने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये राबविण्यात येणारा असून देशातील या प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. रत्नागिरी येथे आसमंत फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या सागर महोत्सवात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले आहे.

काय आहे ओशन प्रकल्प ?

मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बोटींचा प्रामुख्याने वापर करतात. या बोटींच्या इंजिनमध्ये प्रामुख्याने इंजिन ऑइल म्हणजेच वंगण तेल वापरले जाते. एका ठराविक वेळेनंतर बोटींच्या इंजिनातील हे वंगण टेल बादलेले जाते. यानंतर वापरले गेलेले तेल हे काही कामासाठी ठेऊन इतर उरलेले तेल समुद्रात फेकून दिले जात होते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषण होत होते. 'ओशन' या प्रकल्पासाठी २०२३ साली एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार एका बोटीमध्ये १५ लीटर इंजिन ऑईल भरले जाते. त्यापैकी १० लीटर वंगण तेल वापरानंतर उरते. तर छोट्या बोटींमध्ये या तेलाची मात्रा ही ७.५ लीटर उरते. महाराष्ट्रात सुमारे १९ हजार नोंदणीकृत जहाजे असून या जहाजामधून वापरुन काढण्यात आलेले तब्बल ६ लाख लीटर तेल हे समुद्रात फेकले जात होते.

त्यामुळे हे तेल समुद्रात फेकले जाऊ नये यासाठी 'ओशन' प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ बंदरांवरील मच्छीमारांकडून हे वंगण तेल आता विकत घेतले जाणार आहे. साधारण २० रुपये प्रती लिटर असे पैसे मच्छीमारांना दिले जाणार आहे. त्यामुळे फेकून देण्यात येणाऱ्या या तेलाच्या माध्यमातून आता मच्छीमारांना पैसे कमावता येणार आहे.

पुण्यातील कंपनी घेणार तेल विकत

पुण्यातील एक कंपनी हे तेल विकत घेणार आहे. या प्रकळपातून मच्छीमारांना रोजगार मिळणार असून समुद्रात फेकल्या जाणाऱ्या तेलाचा पुनर्वापर करता येणार आहे. 'जीआयपीई'च्या 'सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट'चे प्रमुख गुरुदास नूलकर यांनी हिंदुस्तान टाइम्समराठीशी बोलतांना सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार आम्ही बोटींचे वापरले गेलेले इंजिन ऑइल गोळा करण्यासाठी तब्बल १२ केंद्रे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार केले आहेत. गोळा करण्यात आलेले हे तेल प्रामुख्याने कंपनीच्या बॉयलर इंधन आणि इतर लुब्रिकेशनच्या कामासाठी वापरले जाते. राज्याच्या इतर किनारी जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबावला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही दोन महिन्यांमध्ये ५०० लीटर वंगण तेलाचे संकलन केले आहे. यामुले सागरी प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर