मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 16, 2024 09:23 PM IST

Ghatkopar Hoarding Collapse Case : घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूरमधून अटक केली.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक

Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईत सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळून त्यात १७ जणांचा बळी गेला आहे. १७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde Arrested) पोलिसांनी अखेर मुसक्या आवळ्या आहेत. त्याला राजस्थानमधील उदयपूर शहरातून अटक करण्यात आली. दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता.

ट्रेंडिंग न्यूज

घाटकोपर परिसरातील छेडानगर येथे जाहिरातीचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली १०० जण अडकले होते. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. दोन दिवसांनंतर बचावकार्य थांबवण्यात आले. आता या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला अटक करण्यात आली आहे.

होर्डिंग दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिंडे फरार होता. पोलीस दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर आज मुंबई क्राइम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला उदयपूरमधून अटक केली. त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. आरोपी भावेश भाच्याच्या नावाने एका हॉटेल रूम बुक करून उदयपूरमध्ये रहात होता.

घाटकोपर होर्डिग दुर्घटनेप्रकरणी घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर भावेश भिंडे याने मुंबईतून पळ काढत राजस्थानमध्ये आश्रय घेतला होता. मात्र दोन दिवसांच्या शोधानंतर मुंबई पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

भावेश लोणावळ्यात असल्याचे समजल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. मात्र त्यापूर्वीच त्याने तेथून पळ काढला. दुर्घटनेनंतर त्याचा मोबाईलही बंद येत होता. मात्र आता पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे.

घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी, ७५ जखमी -

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ६० तासांहून अधिक काळ बचाव मोहीम राबवल्यानंतर प्रशासनाने बचाबकार्य थांबवलं आहे. सोमवारी सायंकाळी मुंबईत धुळीचे वादळ तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यात आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी लिम्का बुकमध्ये नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावरील होर्डिंग थेट पेट्रोल पंपावर कोसळले. यावेळी पावसापासून बचावासाठी तेथे थांबलेले १०० हून अधिक लोक अडकले.

IPL_Entry_Point