मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 13, 2024 08:47 PM IST

Ghatkopar hoarding collapse case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबाबत उच्च स्तरीय चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची होणार उच्च स्तरीय चौकशी
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची होणार उच्च स्तरीय चौकशी

Ghatkopar Hording collapse :  घाटकोपरमध्ये (Ghatkopar)  छेडानगर येथे एका पेट्रोल पंपावर १२० फुटांचे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ६२ जणांना रेस्क्यू करण्यात आले असून जखमींवर राजावाडी रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

शहरात अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून या दुर्घटनेची माहीती घेतली. 

दुपारी साडे चारच्या सुमारास घाटकोपर येथे लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यातील ६२ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच होर्डिंगखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. 

या दुर्घटनेचा आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, घाटकोपर भागात झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बचावकार्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत अनेक जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर होर्डिंग अनधिकृत होते की नाही, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जर हे होर्डिंग अनधिकृत असेल तर होर्डिंग मालकावर कारवाई केली जाईल. तसंच वादळ-वाऱ्यात होर्डिंग कोसळू नये म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिल्या आहेत. ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठे होर्डिंग लावू नयेत, महापालिकेचा परवाना असल्याशिवाय अशी होर्डिंग उभारली जाऊ नयेत, यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

४० फुटास परवानगी असताना १२० फुटी होर्डिंग कसे? 

मुंबई महानगर पालिकेकडून फक्त ४० फूटांचे होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात येत असते. तरीही कोसळलेले होर्डिंग १२० फूटांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. होर्डिंग लावणाऱ्याला यापूर्वीच पालिकेने नोटीस पाठवली होती. 

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया -

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point