Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

Feb 03, 2025 06:20 AM IST

Pune GBS Outbreak: पुण्यात जीबीएसचा कहर सुरूच आहे. रोज जीबीएसचे रुग्ण पुण्यात आढळत आहे. पुण्यात रुग्णसंख्या ही १५० पार गेली आहे.

पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू (Pixabay)

Pune GBS Outbreak: पुण्यात जीबीएस आजारामुळे नागरिकांची चिंता वाढली असून रुग्णांची रोज वाढत आहे. पुण्यात रविवारी जीबीएसचे १० रुग्ण आढळले असून, यामुळे रुग्णांची संख्या ही १५८ झाली आहे. राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या १५८ पेक्षा जास्त झाली आहे. यातील २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पुण्यात ५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांचा उद्रेक झाला आहे. पुण्यात १५८ रुग्ण सापडले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १२७ रुग्णांचे जीबीएस चाचणी अहवाल, पॉझिटिव्ह आले आहे. यातील ३१ रुग्ण हे पुणे मनपा हद्दीतील आहे. तर ८३ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आढळले आहे. तर १८ रुग्ण प्रिपरी चिंचवड मनपा व १८ रुग्ण पुणे ग्रामीण व इतर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी आतापर्यत ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. तर ४८ रुग्ण आयसीयुमध्ये व २१ रुग्ण व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहेत.

पुण्यात टँकरद्वारे दुषीत पाणीपुरवठा

पुण्यात सिंहगड मार्गावरील किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी या तिन्ही गावांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरच्या पॉईंटची तपासणी करण्यात आली असून याकह परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे या पाण्याची तपासणी करण्यात आली असून यात रोज २०० पेक्षा जास्त टँकर या १५ पॉईंट्वरून भरले जातात. महापालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या सगळ्या टँकरच्या पाण्यात ई कोलाय आणि कॉलीफॉर्मचे विषाणू आढळून आले आहेत. तर १५ टँकर भरण्याच्या सगळ्या पॉईंट्वरून टँकरने होणारा सगळा पाणी पुरवठा दुषित असल्याचं आढळलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर