Ajit Pawar on GBS : जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar on GBS : जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar on GBS : जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Published Feb 16, 2025 12:45 PM IST

Ajit Pawar on GBS :पुण्यात सध्या जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजाराबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar on GBS : पुण्यासाह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजारमुळे आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्याने होत असल्याचं पुढं आहे. मात्र, या आजारासंदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.  

दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होतो आजार : अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस संदर्भात म्हटवाच विधान केलं आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होतं असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, असेही पवार  म्हणाले.  कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेऊन खावे असे देखील पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले,  पुण्यात खडकवासला परिसरात  गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस (GBS) चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. येथील परिसरात दूषित पाण्यामुळे येथील नागरिक जीबीएसमुळे बाधित झाले असावे असे वाटले होते. मात्र या परिसरातील काहींचे म्हणणे आहे की, कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झाला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असून  मी आता राजेंद्र भोसले यांना प्रेसनोट काढायला सांगणार आहे. तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पवार म्हणाले. 

पुण्यात जीबीएसच्या रूग्णात वाढ 

पुण्यात जीबीएस बंधितांची संख्या वाढत आहे. रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्या कमी दिसत असून पुण्यात १२४  बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शनिवारी नव्याने एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली आहे.  त्यातील १८१ जणांना  जीबीएस झाल्याचं निष्पन्न झालं आहे. जीबीएसचे रुग्ण ज्या भागात आढळले आहे, तेथील सर्वेक्षण सुरू आहे. तसेच या भागात शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. 

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर