मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सिंगापूरच्या धर्तीवर होणार धारावीचा विकास ! गौतम अदानींनी सुरू केले काम, US-UK च्या कंपन्यांशी केला करार

सिंगापूरच्या धर्तीवर होणार धारावीचा विकास ! गौतम अदानींनी सुरू केले काम, US-UK च्या कंपन्यांशी केला करार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 01, 2024 07:52 PM IST

Dharavi Redevlopment Project : सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा विकास होणार आहे. अदानी समुहाने याचा प्लान आखला आहे. यासाठी परदेशी कंपन्यांची मदत घेतली आहे.

Dharavi overhaul project
Dharavi overhaul project

मुंबई - मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाचे काम गौतम अदानी यांच्या कंपनीला मिळाले आहे. त्यांची कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL)ने या प्रकल्पाचे प्लॅनिंग आणि डिझायनिंगसाठी जागतिक लेव्हलच्या कंपन्यांना हायर करणे सुरू केले आहे. कंपनीने अमेरिकेची डिझायनिंग कंपनी Sasaki ब्रिटनची कन्सल्टन्सी फर्म Buro Happold आणि आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टरसोबत करार केला आहे. Sasaki आणि Buro Happold शहर नियोजन व इंजीनिअरिंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. त्याचबरोबर सिंगापूरमध्ये तज्ज्ञ लोकांनाही या प्रकल्पाच्या टीमसोबत जोडले आहे.

अदानी ग्रुपच्या रिअल एस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अदानी प्रॉपर्टीजने नोव्हेंबर २०२२ मध्ये धारावीच्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी सर्वाधिक बोली लावली होती. डीआरपीपीएलमध्ये अदानी ग्रुपचा हिस्सा ८० टक्के तर महाराष्ट्र सरकारचा हस्सा २० टक्के आहे. अदानी प्रॉपर्टीज कंपनीने धारावीसाठी ५,०६९ कोटी रुपयांची बोली लागली होती. धारावी झोपडपट्टी जवळपास ६०० एकर जागेत पसरली असून आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. शहर विकास क्षेत्रात सासकी (Sasaki) कंपनीला ७० वर्षांचा अनुभव आहे तर Buro Happold कंपनीला क्रिएटिव्ह आणि व्हॅल्यू ड्रिवन इन्फ्रास्ट्रक्चर सॉल्यूशनसाठी ओळखले जाते. त्याचबरोबरआर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टरला मुंबईत सोशल हाउसिंग अँड स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी प्रोजेक्ट्ससाठी ओळखले जाते.

सिंगापूरच्या धर्तीवर होणार विकास -

डीआरपीपीएलच्या प्रवक्क्त्याने सांगितले की, धारावी पुनर्विकास योजना केवळ एक पुनर्विकास योजना नाही. आमचे उदिष्ठ धारावीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानात सुधार करणे आहे. आम्ही यामध्ये कोणतीच कसर ठेवणार नाही. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विकास केला जाईल. १९६० च्या दशकात सिंगापूरची स्थितीही आजच्या धारावीप्रमाणेच होती. मात्र आज सिंगापूर संपूर्ण जगासाठी एक उदाहरण ठरले आहे.

धारावीमध्ये ८.५ लाखाहून अधिक लोक राहतात. म्हणजेच येथे लोकसंख्या घटना ३५४,१६७ लोक आहे. ही जगातील सहावी सर्वाच घनदाट लोकवस्ती आहे. यामध्ये गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यातील लोक राहतात.

WhatsApp channel

विभाग