मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chembur cylinder blast : चेंबूर येथे गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! दुकानं कोसळली, अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, ९ जण जखमी

Chembur cylinder blast : चेंबूर येथे गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! दुकानं कोसळली, अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, ९ जण जखमी

Jun 06, 2024 12:08 PM IST

Chembur Gas cylinder blast : मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट ऐवढा भयंकर होता की आजूबाजू असणाऱ्या अनेक दुकानांच्या काचा फुटल्या तर काही जण जखमी झाले.

मुंबईतील चेंबुर येथे एका घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.
मुंबईतील चेंबुर येथे एका घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

Chembur Gas cylinder blast : मुंबईतील चेंबुर येथे एका घरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. हा स्फोट ऐवढा भीषण होता की आजूबाजू असणाऱ्या अनेक घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या तर काही घरच्या भिंती देखील कोसळल्या. या घटनेत तब्बल ९ जण जखमी झाले असून यातील काही जण हे गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला याचे कारण समजू शकले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

golden temple : सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणा, भिंद्रनवालेचे पोस्टरही झळकले, ऑपरेशन ब्लू स्टारवरून अमृतसरमध्ये तणाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ७ च्या सुमारास सीजी गिडवाणी रोड स्मोक हिल सलूनच्या मागे गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका घरात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत ओम लिंबाजिया (वय ९), अजय लिंबाजिया (वय ३३), पूनम लिंबाजिया (वय ३५), मेहक लिंबाजिया (वय ११), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय ५३), पियुष लिंबाजिया (वय २५), नितीन लिंबाजिया (वय ५५), प्रीती लिंबाजिया (वय ३४), सुदाम शिरसाट (वय ५५) हे गंभीर जखमी झाले असून या सर्वांना सायन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

IIT Bombay News : आयआयटी मुंबईनं मारली बाजी! जागतिक क्यूएस क्रमवारीत ११८ व्या स्थानी घेतली झेप

सिलेंडरचा स्फोट झाल्यावर येथे आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि मुंबई अग्निशमन विभागाच्या तीन फायर गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. हा स्फोट ऐवढा भीषण होता की, घराजवळील दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे दुकानाची पडझड देखील झाली आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहे. या घटनेत या दुर्घटनेत अनेक गाड्यांचे देखील नुकसान झालं आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

आज सकाळी झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. येथील स्थानिक नागरिक स्फोटाच्या आवाजामुळे भयभीत झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शी यांची देखील पोलिस चौकशी करत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग