Vande Bharat Train : जेवणात बाप्पाचा आवडता पदार्थ मिळणार; वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशभक्तांसाठी खास सुविधा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vande Bharat Train : जेवणात बाप्पाचा आवडता पदार्थ मिळणार; वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशभक्तांसाठी खास सुविधा

Vande Bharat Train : जेवणात बाप्पाचा आवडता पदार्थ मिळणार; वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशभक्तांसाठी खास सुविधा

Published Sep 19, 2023 12:11 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाच्या काळात वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Vande Bharat Train Ganesh Chaturthi 2023
Vande Bharat Train Ganesh Chaturthi 2023 (HT)

Vande Bharat Train Ganesh Chaturthi 2023 : भारतातील अनेक राज्यांमध्ये आजपासून गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तीची आणि अन्य साहित्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात गणेशभक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गणेशभक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यातील मेट्रो, बससेवा आणि मुंबईतील बेस्टच्या बसेस रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यातच आता भारतीय रेल्वेने देखील गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना जेवणात बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच मोदक दिला जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून साडेचार हजार मोदकांची स्पेशल ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळं आता वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना जेवणात मोदकांचा समावेश करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर आणि मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना मोदकाची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील मुख्य शहरांतून भाविक मोठ्या संख्येने गावाकडे रवाना होत असतात. परिणामी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपासून गणेश चतुर्थी सुरू होत असल्याने गणेशभक्तांना खुश करण्यासाठीच रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून साडेचार हजार मोदकांची ऑर्डर देण्यात आली असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या भाविकांना जेवणात मोदक देण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवसापर्यंत भाविकांना जेवणात मोदक देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या