मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Rojgar Melava : ठाण्यातील रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार गणपत गायकवाड यांचं नाव, वादाची ठिणगी

Thane Rojgar Melava : ठाण्यातील रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार गणपत गायकवाड यांचं नाव, वादाची ठिणगी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2024 09:39 AM IST

Ganpat Gaikwad guests Of Thane Rojgar Melava: जमिनीच्या वादातून शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे महेश गायकवाड यांचे ठाण्यातील रोजगार मेळाव्यातील प्रमुख पाहुण्यांच्या यादीत नाव असल्याने वाद निर्माण झाला आहे.

Ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad

Thane Rojgar Melava: राज्य सरकारच्या बहुचर्चित रोजगार मेळाव्याला आजपासून वागळे इस्टेट येथे सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणात कल्याण पूर्वेचे तीन वेळा आमदार राहिलेले गणपत गायकवाड यांचे नाव प्रमुख पाहुण्यांमध्ये नमूद करण्यात आले. गणपत गायकवाड यांनी गेल्या महिन्यात जमिनीच्या वादातून शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाली होती. गणपत गायकवाड यांचे नाव ठाणे मेळाव्यातील प्रमुख पाहुण्यांमध्ये असल्याने वाद निर्माण झाला आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट येथील मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये कोकण विभागासाठी रोजगार मेळावा ६ आणि ७ मार्च २०२४ रोजी होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी या ठिकाणी आढावा बैठक झाली.

या मेळव्यात एकूण ३५२ स्टॉल असतील. पहिल्या दिवशी सुमारे १ हजार ७४ कंपन्या सहभागी होणार असून ५६,०२० जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ मार्च रोजी सुमारे १ हजार ४५ कंपन्या सहभागी होणार आहे. या दिवशी ४४ हजार ७७४ जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण फलकावर गणपत गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख प्रमुख पाहुण्यांमध्ये करण्यात आला आहे. २ फेब्रुवारी रोजी गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. जमिनीच्या वादावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला आणि दोन्ही पक्ष तक्रार देण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांना गोळ्या घातल्या. या घटनेत महेश गायकवाड आणि त्यांचा सहाय्यक जखमी झाले. हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गायकवाडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

IPL_Entry_Point

विभाग