मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol : १५ गंभीर गुन्हे, दहशतवाद्याची जेलमध्येच हत्या करणाऱ्या शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवसादिवशीच खेळ खल्लास

Sharad Mohol : १५ गंभीर गुन्हे, दहशतवाद्याची जेलमध्येच हत्या करणाऱ्या शरद मोहोळचा लग्नाच्या वाढदिवसादिवशीच खेळ खल्लास

Jan 05, 2024 07:19 PM IST

Gangstar Sharad Mohol murder : शरद मोहोळ पुण्यातील कुख्यातगुंड असून त्याच्यावरहत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हेनोंद आहेत. जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवाद्याला मोहोळ याने तुरुंगातच मारले होते. त्यानंतर त्यांची हिंदू डॉन अशी ओळख निर्माण झाली होती.

Gangstar Sharad Mohol
Gangstar Sharad Mohol

एका गँगस्टरच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली आहे. तलवार गँगचा शहर परिसरात धुमाकूळ  सुरु असतानाच पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने पुणे हादरले आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरातील सुतारदरा येथे गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर चार गोळ्या झाडल्या होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा, सुतारदरा, कोथरूड) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने मोहोळवर गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील होता. मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा चालक म्हणून शरद मोहोळ काम करत होता. शरद मोहोळ हा संदिप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ  होता. संदिप मोहळची गणेश मारणे टोळीने २००७ मध्ये हत्या केली होती. त्यावेळी शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली. २०१० ला शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा पुण्यातील निलायम टॅाकीजजवळ खून केला.

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात जामीन मिलाल्यानंतर दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. जुलै २०२२ मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.

शरद मोहोळच्या नावावर किमान १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर २०१२ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी महंमद कातील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातून २०१९ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.

शरद मोहोळची पत्नी स्वातीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. कोथरूडमधील स्वरद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांची पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. पत्नीला नगरसेवक करण्यासाठी  शरद मोहोळ याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवाया थंडावल्या होत्या. मात्र, आज लग्नाच्या वाढदिवशीच त्याचा गेम केल्याने पुण्यातील गँगवॉर पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग