मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जेवणाचं बिल देण्यावरून हाणामारी; हॉटेल मॅनेजर जखमी, ढाब्याचंही मोठं नुकसान

जेवणाचं बिल देण्यावरून हाणामारी; हॉटेल मॅनेजर जखमी, ढाब्याचंही मोठं नुकसान

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 25, 2022 03:51 PM IST

Maharashtra Crime News : जेवण केल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळं टोळक्यानं हॉटेलमध्ये तुंबळ हाणामारी करत गोंधळ घातला आहे. या मारामारीत हॉटेलचा मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Ulhasnagar Crime News : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून निर्माण झालेल्या वादावरून टोळक्यानं हॉटेलच्या मॅनेजरला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. यात ढाब्याचं मोठं नुकसान झालं असून मॅनेजरला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरमधील हील लाईन पोलीस ठाण्यात पाच ते सहा लोकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरमध्ये संध्याकाळच्या वेळेला पाच ते सहा लोक जेवणासाठी एका ढाब्यावर आले होते. त्यांनी जेवण केल्यानंतर बील देण्याच्या वादावरून मॅनेजरला मारहाण केली. हाणामारीचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत उल्हासनगरमध्ये वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनेमुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हॉटेलमधील या सर्व मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी धाब्याचा मॅनेजर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेला होता, त्यावेळी पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, परंतु अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली. त्यामुळं पोलिसांना गुन्ह्याविषयी नसलेल्या गंभीरतेवरही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसात एक हत्या आणि एक आत्महत्येची केस समोर आली आहे. तर नागपूरात सातत्यानं वाढत्या क्राईमच्या घटनांमुळं शहराची ओळख राज्यातील क्राईम कॅपिटल अशी होत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या उपनगरांमध्येही खुन व बलात्काराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग