मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बहिणीशी भांडून रात्री पडली घराबाहेर; महिलेवर दोन जिल्ह्यात अनेकवेळा अत्याचार
सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
05 August 2022, 18:48 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 18:48 IST
  •   बहिणीशी भांडून घरातून रात्री बाहेर पडलेल्या महिलेवर दोन जिल्ह्यात अनेक ठिकाणी बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

भंडारा -  घरातून भांडून रात्री बाहेर पडलेल्या महिलेवर दोन जिल्ह्यात अनेक ठिकाणी बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात घडली आहे. ३५ वर्षीय महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पीडित महिला ही पतिपासुन विभक्त झाली असून गोंदिया जिल्हातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. ३० जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती भंडारा जिल्ह्यात आईकडे जाण्यासाठी निघाली असता प्रथम दर्शनी संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन  ३०  जुलै रोजी तिच्यावर अत्याचार केला. तसेच दुसऱ्या दिवशी ३१ जुलैला देखील पळसगाव जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

दरम्यान पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावाजवळ असलेल्या एका ढाब्यावर पोहचली असता तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने आपल्या मित्रासोबत १ ऑगस्ट रोजी तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचारानंतर कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळच्या सुमारास तिला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला.

वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. तसेच महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करत पुढील उपचारासाठी नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलविण्यात आले आहे. 

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग