मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar: घाटी रुग्णालयात टोळक्याची रुग्णाला मारहाण; महिला डॉक्टरवरही रॉडनं हल्ला

Sambhajinagar: घाटी रुग्णालयात टोळक्याची रुग्णाला मारहाण; महिला डॉक्टरवरही रॉडनं हल्ला

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2024 03:56 PM IST

Sambhajinagar Ghati Hospital Viral Video: संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Sambhajinagar Ghati Hospital Video
Sambhajinagar Ghati Hospital Video

Viral Video: छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये गुरुवारी रात्री साठेआठ वाजताच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. या घटनेत महिला डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णासह त्याच्यासोबत आलेल्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये घाटी रुग्णालयाबाहेर हाणामारी झाली. या घटनेत जखमी झालेला तरुण त्याच्या एका मित्रासोबत उपचारासाठी घाटीतील रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी जखमींवर उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील ८-१० जण रुग्णालयात आले आणि त्यांनी पुन्हा मारहाण सुरू केली. यावेळी एका तरुणाच्या हातातील रॉडचा फटका महिला निवासी डॉक्टरला लागला. यामध्ये महिला डॉक्टर जखमी झाल्या. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी काम बंद निषेध व्यक्त केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्वरित पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि निवासी डॉक्टरांची समजूत काढली. त्यानंतर रुग्णसेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली. तसेच रुग्णालयात गोंधळ सुरू असताना सुरक्षारक्षक जवानांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. या सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली.

WhatsApp channel