Delhi Rape Crime: राजधानी दिल्ली बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. येथील द्वारका उत्तर भागात १६ वर्षीय तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तिने याला विरोध केल्यावर आरोपींनी पीडित मुलीला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत पीडिता ही गंभीर जखमी झाली असून तिला तिच्या कुटुंबीयांनी दवाखान्यात भरती केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे. या पूर्वी देखील पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर यापूर्वीही सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुलीने त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा या साठी दबाव आणत होते. दरम्यान, याच आरोपींनी देखील हे कृत्य केले असावे असा संशय मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी त्यांचा हात असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी आणि तरुणी एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही तिच्या कुटुंबासह द्वारका परिसरात एका सोसायतीत राहते. सोमवारी वडील काही कामानिमित्त दिल्लीबाहेर गेले होते. आईही इतर मुलांसोबत बाहेर होती.
दरम्यान, आरोपी व त्याचे सहकारी तिच्या घरी ही संधी साधून गेले. त्यांनी तरुणीला पिस्तुल दाखवून तिला जवळच्या इमारतीत घेऊन गेले तेथील पाचव्या मजल्यावरील छतावर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने याला विरोध केला असता आरोपींनी पिडीत मुलीला पाचव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. नंतर तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला डीडीयू रुग्णालयात भरती केले.
या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमी पिडीत मुलीला रुग्णालयात दाखल केले. नंतर तिला डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या