Nashik Murder : जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ-gang murdered young man near indiranagar police station one died nashik crime news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Murder : जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Murder : जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ

Sep 23, 2024 03:27 PM IST

Nashik Crime News : कोल्हापूर येथे एका चांदी व्यापाऱ्यांची हत्येची घटना ताजी असतांना नाशिकमध्ये देखील जुन्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.

जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ
जुन्या भांडणावरून युवकावर टोळक्याचा हल्ला! तब्बल २५ वार करत केली हत्या; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News : नाशिक येथे गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाथर्डी येथे जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. एका टोळक्याने तरूणावर हल्ला करत त्याच्यावर धार धार शस्त्राने २५ वार करत त्याची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नंदेश विजय साळवे (वय २०) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी येथील इंदिरानगर पोलीस ठण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. नंदेश हा काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात कोयते, चाकू, सुरे होते. या शस्त्राने त्यांनी नंदेशवर हल्ला केला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. त्याला दवाखान्यात भरती केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांचा पंचनामा केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. नंदेशची हत्या ही जुन्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये गुन्हेगारीत वाढ

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. यात खून, दरोडे या सारख्या घटना प्रामुख्याने घडत आहेत. या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे नाशिक पोलिस ही गुन्हेगारी रोखण्यास यशस्वी होणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कोल्हापूर येथे चांदी व्यापाऱ्याची हत्या 

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी एहतील एका चांदी व्यापाऱ्याची रविवारी हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धार धार शस्त्राने छातीत वार करून ही हत्या करण्यात आली आहे. या सोबतच त्यांच्या दुकानातील २५ किलो चांदी देखील लंपास करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे या खून झालेल्या चांदीच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा धाकट्या भावाला अटक करण्यात आली आहे.

Whats_app_banner
विभाग