धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड

धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड

Jan 27, 2025 01:47 PM IST

Nanded City Crime : पुण्यात गे डेटिंग अ‍ॅपवरून लोकांना जाळ्यात ओढून त्यांना निर्जनस्थळी नेऊन लूटमार करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड
पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड

Nanded City Crime : पुण्यात फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. ग्रॅन्डर अ‍ॅपवरून गे नागरिकांची जवळीक निर्माण करून त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) याला अटक केली आहे. तर त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डीएसके रोड ते रायकर मळा येथे काही तरुण गाड्या अडवितात. माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे, असे सांगून गाडीत बसतात. तसेच गाडी घरी घेण्यास सांगून निर्जनस्थळी नेऊन मारहाण करुन पैसे व मौल्यवान वस्तु लुटत असल्याचा एक मेसेज फिरत होता. दरम्यान, या मेसेजची शहनिशा करण्यासाठी नांदेड सिटी पोलिसांनी सापळा रचला. त्यांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतली. दरम्यान, त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.

ग्रॅन्डर अ‍ॅपद्वारे मैत्रीकरून लूटमार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरुण ‘गे’लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपद्वारे मैत्री करत होते. त्यांना निर्जन स्थळी भेटायला बोलावत होते. तरुण मुलं असल्याने अनैसर्गिक संबंधांच्या आशेने नागरिक ते सांगतील त्या ठिकाणी जात होते. त्यांना निर्जनस्थळी नेल्यावर त्यांचे मित्र कोयता व चाकू सुरे घेऊ ‘गे’ व्यक्तीकडील पैसे, मोबाईल, सोने, महत्वाचा ऐवज लंपास करत होते. त्यांच्या बँकेतून पैसे देखल ते ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेत होते. दरम्यान, बदनामी होईल या भितीने हे लोक तक्रार करत नव्हते. त्यामुळे हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता.

हॉटेल व्यावसायिकाला लुटलं 

दरम्यान, या प्रकरणी एका एका ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार १४ जानेवारी रोजी सायंकाळी डी एस के विश्व शाळेमागे त्यांना आरोपींनी लुटले होते. पीडित व्यक्तीने गुगल प्ले स्टोअर्समधून ग्रॅन्डर अ‍ॅप डाऊनलोड करुन घेतले होते. या अ‍ॅपवरून आरोपीने पीडित व्यक्तिशी जवळीक साधून त्याला डी एस के विश्व येथील कमानीजवळ बोलविले होते. या ठिकाणी पीडित व्यक्तीला आरोपीने त्याच्या दुचाकीवर बसवून त्याला शाळेच्या मागे नेत लुटले होते. पीडित व्यक्तीच्या खिशातील पैसे, मोबाईल व कानातील दोन सोन्याच्या बाळ्या त्यांनी लुटल्या. मोबाईलवरील फोन व जीपेचा पासवर्ड घेत, त्याच्या खत्यातून ५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर