Pune Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव ६ सप्टेंबरपासून सुरू होत असून त्यासाठी आताअवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.‘गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकावर लावण्यात येणाऱ्या लेझर बीम लाइटवर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी लेझर बीम लाइट लावल्यास,कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’असा इशारा पोलिसांनी दिल्यानंतर आता१० दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठीपुणे शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत मार्गदर्शक सूचना तसेच नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
गणेश उत्सवासाठी सार्वजनिक गणपती मंडळांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुर झाले असतानाच प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. या १० दिवसांसाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.
गणशोत्सवात पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूक कोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदाही तीच संख्या निश्चित करण्यात आली आहे. गणेश मंडळांना यंदा जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश करता येणार आहेत.
दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी म्हणजे २०२६ पर्यंत परवानगी असेल, नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र अनिवार्य. मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांहून अधिक आणि रुंदी १० फुटांपेक्षा अधिक नसावी. सर्व मंडळांना देखाव्यांसाठीरात्री १० पर्यंतच परवानगी असेल. कमान,स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक, गणेश मंडळात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक.
त्याचबरोबर मंडपात महिलांची छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे. धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे, प्रखर बीम लाइट नको. दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी.
गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरिकांना बहिरेपणाची समस्या उद्भवली होती आणि काहींना हृदयविकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या होत्या. लेझर बीम लाइटमुळे डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांनी आतापासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.