
पुणे : पुण्यात तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या मुळे जल्लोषाचे वातावरण आहे. गणेश मंडळाने यंदा अनेक आकर्षक देखावे सादर केले आहेत. आज रविवार आल्याने मोठ्या प्रमाणात पुणेकर हे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. यामुळे मध्य पुण्यात मोठ्या प्रमाणणात गर्दी झाली होती.
शहर तसेच उपनगरातील भाविकांनी रात्री आठनंतर शनिवार पेठेतील जयहिंद मंडळ, नातूवाडा मंडळाने साकारलेले वैज्ञानिक देखावे पाहण्यासाठी बालचमुंनी गर्दी केली होती. तर मंडई, बेलबाग चौक, तुळशीबाग, शनिपार, सदाशिव पेठ परिसरातील मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत मध्यभागातील रस्त्यांवर गर्दी होती. या सोबतच बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळ, सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती मंडळ, वंदेमातरम संघाने साकारलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडळ परिसरात भाविकांनी गर्दी केली होती.
रविवारी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी व्यवस्था केली होती. रविवारी प्रमुख मंडळांच्या गणपती दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रविवारची सुट्टी असल्याने नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडले होते. यामुळे पोलिसांनी शनिवारी सायंकाळनंतर शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, मंडई, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद केला होता.
४ ते ८ सप्टेंबरदरम्यान पार्किंगची ठिकाणे
बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना वाहनतळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ, लँडमार्क वाहनतळ, शिरोळे रस्ता, प्रो. यश एंटरप्रायजेस, सर्कस मैदान, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, टिळक पूल ते भिडे पूल नदीकिनारी, बालभवनसमोर, सारसबाग रस्ता ते बजाब पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, हमालवाडा पार्किंग, गोगटे प्रशाला, एस. पी. कॉलेज, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीईओपी मैदान, पुरम चौक ते हॉटेल विश्व, देसाई कॉलेज.
गणेश विसर्जनाच्या येथे असेल पार्किंगची साेय
गरवारे कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान, मंगला टॉकीज, हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता, आयएलएस लॉ कॉलेज, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, फर्ग्युसन कॉलेज, आपटे प्रशाला, बीएमसीसी कॉलेज, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, न्यू इंग्लिश स्कूल.
संबंधित बातम्या
