मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Ganesh Chaturthi 2023 Live Update, Ganesh Festival, Maharashtra Ganesh Utsav Update

Ganesh Chaturthi 2023 live update

Ganesh Chaturthi 2023 live update : अखेर प्रतीक्षा संपली! राज्यात गणारायाचे जल्लोषात आगमन

Ganesh Chaturthi 2023 live update : लाडक्या गणाराच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर आज संपली. आज जल्लोषात गणारायचे स्वागत करून प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. मुंबई, पुणे आणि राज्याच्या इतर भागात सकाळपासून घरगुती आणि मंडळाचे कार्यकर्ते गणरायला घरी आणण्याच्या लागबगीत आहेत.

Tue, 19 Sep 202305:31 AM IST

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्राणप्रतिष्ठापना होत आहे प्राणप्रतिष्ठापनेनंतर आरती होईल आणि त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुला करण्यात येईल.

Tue, 19 Sep 202305:10 AM IST

Pune Ganesh utsav : पुण्यात ढोल ताशांचा गजर; उत्साह शिगेला

पुण्यात गणेश मंडळांच्या वैभवी मिरवणुकांना सुरवात झाली आहे. कसबा, गुरुजी तालिम, दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरामुळे पुण्याचा आसमंत दुमदुमला आहे.  

Tue, 19 Sep 202304:58 AM IST

Sangali Ganpati Bappa 2023 : सांगलीत पारंपारिक लेझीम खेळत बाप्पाचं उत्साहात स्वागत

सांगली येथे आज सकाळपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने अनेक मंडळाने गणपतीचे स्वागत केले. येथील मंडळांच्या मिरावणुकीला सुरुवात झाली आहे. 

Tue, 19 Sep 202303:50 AM IST

Pune Ganeshotsav 2023 : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरांत दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगा; मिरवणुकीला सुरुवात

गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची प्राणप्रतिष्ठाप ने साठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात सुरु झाली आहे. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान होतील सकाळी दहा वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.

Tue, 19 Sep 202303:48 AM IST

Ganesh Chaturthi Celebrations : मराठवाड्याची राजधानी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज; चोख बंदोबस्त 

 मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.  मोठ्या उत्साहात आज ठिकठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. घरघुती गणपतींपासून तर मंडळाची देखील सर्व तयारी झाली आहे. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी पोलीस देखील तयार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनग शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल २  हजार ७००  पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

Tue, 19 Sep 202302:57 AM IST

Nagapur Tekadi Ganpati : नागपुरात टेकडीच्या गणपतीची आरती; भविकांमद्धे आनंदाचे वातावरण 

नागपूर येथील प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिरात आज सकाळी आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन गणरायाला घरी आणले. 

Nagpur tekadi ganpati
Nagpur tekadi ganpati

Tue, 19 Sep 202302:29 AM IST

Mumbai : मुंबईत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन 

Ganesh Chaturthi 2023 live update : वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाच्या  पूजेला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेश ही प्रथम पूज्य देवता आहे. या गणरायाच्या आगमन आज जल्लोषात केले जाणार आहे.

Tue, 19 Sep 202302:25 AM IST

dagadusheth Ganapti : पुण्यात दगडूशेठ गणपतीची तयारी पूर्ण; सकाळी आरतीसाठी हजारो भाविक 

पुण्यात आज गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली आहे. जल्लोषात गणेशाचे आगमन होणार आहे. पुण्यातील दगडू शेठ गणपती मंदिरात आज गणेश गणेश चतुर्थी निमित्त सकाळी आरती करण्यात आली. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. 

dagadusheth Ganapti
dagadusheth Ganapti