Ganesh Chaturthi : गणेश उत्सवाचे वातावरण क्षणात झाले शोकाकूल.. गणपती घरात आणतानाच कोल्हापुरात भाविकाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganesh Chaturthi : गणेश उत्सवाचे वातावरण क्षणात झाले शोकाकूल.. गणपती घरात आणतानाच कोल्हापुरात भाविकाचा मृत्यू

Ganesh Chaturthi : गणेश उत्सवाचे वातावरण क्षणात झाले शोकाकूल.. गणपती घरात आणतानाच कोल्हापुरात भाविकाचा मृत्यू

Published Sep 19, 2023 09:31 PM IST

kolhapur Ganpati : बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन फरशीवर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हीदुदैवीघटना घडली आहे.

इनसेटमध्ये मृत सचिन सुतार
इनसेटमध्ये मृत सचिन सुतार

राज्यात आज मोठ्या जल्लोषी व मंगलमय वातावरणात गणरायाचे वाजत गाजत घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी आगमन झाले. आज अबालवृद्ध गणेश भक्तीत तल्लीन झालेले पाहायला मिळाले. राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घरोघरी बाप्पा विराजमान झाले. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशीच दु:खद घटना समोर आली आहे.

राज्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळाली. मात्र आजरा तालुक्यात उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गोलबोट लागल्याची घटना घडली आहे. बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन फरशीवर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे ही दुदैवी घटना घडली आहे.

सचिन शिवाजी सुतार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन सुतार मंगळवारी सकाळी गणपती घेऊन घरी आले. विधीवत पूजा करून घरात गणपतीनेत असताना गणपतीचा मुकूट वर चौकटीला लागेल म्हणून सचिन थोडे खाली वाकले व मात्र त्याचवेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. त्यांचे डोके घरातील फरशीवर आपटल्यानेडोक्याला जबर मार लागला. त्यांना निपचीत पडलेले पाहून कुटूंबीयांनी भीतीने गाळण उडाली. त्यांनी सचिन यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

 

सचिन हे मुंबईत वास्तव्य करत होते. तसेच तेथे ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होते. गणेश उत्सवासाठी ते मुंबईहून गावी आले होते. गणेश चतुर्थी दिवशी ते सकाळपासून आनंदात व उत्साहत होते. घरातील सर्व तयारी करून गणेश मूर्ती आणायला गेले आणि गणपती मूर्ती घरात येताच त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेने सुतार कुटूंबावर ऐन सणादिवशी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील उत्साही वातावरण क्षणात शोकाकूल बनले. सचिन यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. गणेश चतुर्थी दिवशी घडलेल्या या दु:खद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर