मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंद होणार Googleचे हे लोकप्रिय ॲप ! ५० कोटींहून अधिक वेळा झाले आहे डाउनलोड; वाचा

बंद होणार Googleचे हे लोकप्रिय ॲप ! ५० कोटींहून अधिक वेळा झाले आहे डाउनलोड; वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 31, 2024 02:05 PM IST

Google Podcasts हे ॲप बंद होणार आहे. कंपनी या वर्षाच्या शेवटी हे ॲप बंद करणार आहे.

 बंद होणार गूगलचे हे लोकप्रिय ॲप! ५० कोटींहून अधिक वेळा झाले आहे डाउनलोड; वाचा
बंद होणार गूगलचे हे लोकप्रिय ॲप! ५० कोटींहून अधिक वेळा झाले आहे डाउनलोड; वाचा (Reuters)

Google Podcasts हे ॲप बंद होणार आहे. कंपनी या वर्षाच्या शेवटी हे ॲप बंद करणार आहे. ॲप बंद होण्यापूर्वी, या कंपनीचे सदस्यत्व असणाऱ्या विद्यमान वापरकर्त्यांना YouTube Music Axis वर स्थलांतरित होण्यास गुगलने संगितले आहे. त्याची शेवटची तारीख २ एप्रिल आहे. Google Podcast ॲप ५० कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

दानवे विरुद्ध खैरे दिलजमाई! प्रचार करणार नाही म्हणणारे दानवे थेट पेढे घेऊन पोहचले खैरेंच्या घरी; वाद मिटला

गुगल आणखी एक सेवा बंद करणार आहे. यावेळी गुगल पॉडकास्ट ॲप बंद करणार आहे. या बाबत गुगलने सांगितले की ते या वर्षाच्या शेवटी हे ॲप बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात गूगलने त्याच्या वापरकर्त्यांना ईमेल पाठवून सबस्क्रिप्शन एक्सपोर्टची माहिती देत ​​आहे.

viral news : पुण्यात देशी दारू दुकानात मद्यपींचा तुफान राडा; मात्र, एकाने कोपऱ्यात गुपचूप उरकला कार्यक्रम; पाहा व्हिडिओ

एकाच ॲपमध्ये पॉडकास्ट आणि गाण्यांच्या ॲक्सेस मिळणार

गुगलने गेल्या वर्षीच YouTube Music ॲपमध्ये पॉडकास्ट-संबंधित वैशिष्ट्ये समाविष्ट केले आहे. आता कंपनी त्यावर सर्व फिचर्स आणणार आहे. यामुळे यूझर्सना एकाच ॲपमध्ये पॉडकास्ट आणि संगीत ऐकता येणार आहे. Google Podcasts ॲप अजूनही ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. विद्यमान वापरकर्ते २ एप्रिलपूर्वी नवीन ॲपवर वापरू शकणार आहेत. कंपनी सध्या अमेरिकेत हा बदल करत आहे. येत्या काही दिवसांत ते इतर बाजारपेठांमध्येही हे ॲप बंद केले जाणार आहे.

५० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले

Google Podcast ॲप प्ले स्टोअरवर ५० कोटी पेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. एडिसनच्या अहवालानुसार, २३ टक्के यूझर्स पॉडकास्टसाठी YouTube Music ॲप निवडतात. पॉडकास्ट ॲप वापरणाऱ्यांची संख्या केवळ ४ टक्के राहिली आहे. या बदलासह, गुगलला त्याच्या सर्व संगीत ॲपचा वापर एका प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या तयारीत आहे. गुगल स्वतःच्या YouTube Music ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, त्यात पॉडकास्ट ॲपची अधिकाधिक वैशिष्ट्ये समाविष्ट करत आहेत. यात आरआरएस फीडसह ओपीएमएल फाइल डाउनलोड हे फीचर देखील समाविष्ट करण्यात आले आहे.

WhatsApp channel

विभाग